भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि. बीड येथील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी 12 च्या सुमारास घडली.
बियाणी यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. माहिती समजताच नातेवाईकांनी त्यांना बीड येथील फिनिक्स रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपाधीक्षक संतोष वाळके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांनी धाव घेतली. बियाणी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांसह भाजप पदाधिकारी यांनी मोठी गर्दी केली आहे. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tagged