महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यास्थपकांनी लाज सोडली
सिरसाळा : दि.4 : येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यास्थपकांनी लाज सोडली आहे. पीक कर्जासाठी रांगेत उभे असलेल्या एका (45) वर्षीय महिलेला हात धरून ‘ये बाई आत मध्ये तू माझ्या जवळ का आली नाही’ म्हणून लज्जा वाटेल. अशा शब्दात कृत्य करून शिवीगाळ केली. या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सिरसाळा येथील शाखा व्यवस्थापका विरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र ग्रामीण बँक समोर पीडित महिला व तिचे पती पीक कर्जासाठी मंगळवारी (दि.3) रांगेत उभे होते. यावेळी शाखा व्यवसथापक यांनी फिर्यादीच्या पतीला विचारले तुझी पत्नी कुठे आहे, विचारत पतीने रांगेत उभा असल्याचे सांगितले. शाखा व्यस्थापक अशोक वैजनाथ आर्धापुरे यांनी हात धरून बाई तू आत चल असे म्हणत लज्जा वाटेल असे कृत्य करून शिवीगाळ करत विनयभंग केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारी वरून सिरसाळा पोलीस ठाण्यात कलम 354, 504 कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संतोष जेटेवाड करीत आहे.