चार चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी एलसीबीने केले मुद्देमालासह गजाआड

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

 बीड दि.28 : पोलीस उपअधीक्षक राहुल अवारे यांच्या घरासह इतर पाच ठिकाणी चोरी करणार्‍या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.27) रात्री केली. चोरट्यांकडून सव्वा दोन लाखाच्या मुद्देमालासह एक बोलेरो पिकअप जप्त करण्यात आली आहे.

      अफजल खान उर्फ बब्बू असीम खान (वय 25) व शेख समीर शेख समसोद्दीन (दोघे रा.बिलालनगर इमामपूर रोड, ता.जि.बीड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेने बार्शीनाका परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नेकनूर, पाटोदा, परळी, धारुर सह अन्य एका ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून तेल डब्बे, काजु, किराणा साहित्य असा सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत एक बोलेरो पिकपही पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. सदरील आरोपी हे सराईत नसून त्यांनी पहिल्याच वेळी चार ठिकाणी धाडसी चोरी केल्याने अर्श्चय व्यक्त केले जात आहे. स्थानिक गुन्हे शाखा पुढील तपास करत असून ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टिमने केली.

Tagged