sanjay rathod

संजय राठोड यांचा अखेर राजीनामा

क्राईम राजकारण

मुंबई- मंत्री संजय राठोड यांनी अखेर मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने आक्रमक भुमिका घेतली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाही, इशारा देखील दिला होता. भाजपच्या चित्रा वाघ यांनी दररोज पत्रकार परिषदा घेऊन आत्महत्या प्रकरणाचे सगळे पुरावे जगजाहीर केले होते. परंतु तरीही संजय राठोड यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत होता. अखेर विरोधी पक्ष आणि माध्यमांच्या दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यामुळे ठाकरे यांनी पक्षातील सर्व महत्वाच्या नेत्यांशी चर्चा करून संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. आता हा राजीनामा मंजूर केला की नाही हे मुख्यमंत्री दुपारी होणाार्‍या पत्रकार परिषदेत जाहीर करतील.