कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड


महाजनवाडी फाटा येथील घटना
पाटोदा
दि.25 : भरधाव कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा गंभीररित्या जखमी होवून जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.25) रात्री 7 च्या सुमारास मांजरसुंबा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील महाजनवाडी वाघिरा फाटा येथे झाला.
पोपट भानुदास मस्के (वय 38) व घैनीनाथ विठ्ठल मस्के (वय 40 दोघे रा.भाळवनी) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. पोपट व घैनीनाथ हे दोघे कारखान्याची उचल आणण्यासाठी दुचाकीवर पारनेर येथे गेले होते. ते दुचाकीवरुन (एमएच13, 3973) गावी येत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या इंडिगो कारने (एमएच-16 एटी-960) जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीररित्या जखमी झाले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि.मुस्तफा शेख यांच्यासह आदींनी धाव घेतली. मृतदेह मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत.

Tagged