भ्रष्टाचार विरोधी सप्ताहाचा गेवराईत प्रारंभ; लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

गेवराई दि.26 : तपासणी अहवाल चांगला पाठवण्यासाठी आगार प्रमुखाने कर्मचार्‍याकडे लाचेची मागणी केली. सदरील लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.26) दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबादच्या एसीबीने केली. भ्रष्टाचार विरोधी सप्ताहाच्या प्रारंभदिनी ही कारवाई करण्यात आली आहे.
श्रीनिवास के. वाघदरिकर हे गेवराई आगारप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. येथील कार्यालयाची बीड विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. यावेळी तक्रारदाराच्या कामकाजात त्रुट्या आढळून आल्या होत्या. या संदर्भात वरिष्ठांकडे चांगला अहवाल देण्यासाठी वाघदरिकर यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी 15 हजाराची लाच स्विकारताना कार्यालयाच्या बाहेरील हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबादच्या एसीबी टिमने केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

Tagged