माजलगावात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले अर्भक!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव


माजलगाव दि.25 : शहरातील बसस्थानकाच्या शौचालयाच्या परिसरात एक मयत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे घटनास्थळी माजलगाव शहर पोलिसांनी धाव घेतली असून और बघ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले आहे.
माजलगाव येथील बस्थानाकाच्या परिसरामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोमवारी (दि.25) सकाळी एक मयत अर्भक आढळून आले. याची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्भक ताब्यात घेत माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अर्भक स्त्री जातीचे की पुरुष जातीचे हे समजू शकले नाही. 5 ते 6 महिन्याचे हे अर्भक असल्याची माहिती आहे. अर्भक कुणाचे आहे? कुणी फेकले आदी तपास माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.लक्ष्मण केंद्रे,अविनाश , राठोड, पोलिस जमादार तोटेवाड, ठेंगल, चालक श्रिमंत पवार महिला कर्मचारी मिना काळे या पुढील तपास करत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Tagged