corona testing lab

पॉझिटिव्ह बातमी : बीड जिल्ह्यातील 8 हजार 727 कोरोनामुक्त

न्यूज ऑफ द डे बीड

आज नवीन 137 रुग्ण पॉझिटिव्ह

बीड :जिल्हावासियासाठी आज पॉझिटिव्ह बातमी आहे. कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत 8 हजार 727 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 11 हजार 135 बाधित रुग्ण आढळलेले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 323 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

आज (दि.7) रोजी बीड जिल्हा प्रशासनाला आज बुधवारी दुपारी प्राप्त झालेल्या 785 अहवालापैकी 137 पॉझिटिव्ह तर 648 निगेटिव्ह आले आहेत. नवीन पॉझिटिव्ह रुग्णापैकी बीड तालुक्यातील 31, अंबाजोगाई 24, आष्टी 28, धारुर 6, गेवराई 8, केज 1, माजलगाव 9, परळी 2, पाटोदा 8, शिरुर कासार 3 आणि वडवणी तालुक्यातील 17 रुग्णांचा समावेश आहे.

Tagged