बीड जिल्हा परिषदेतील अनुकंपाधारकांच्या नियुक्त्या लांबणीवर

न्यूज ऑफ द डे बीड

उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांची माहिती
बीड : येथील जिल्हा परिषदेतील अनुकंपाधारकांच्या नियुक्त्या पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या आहेत. यासाठी रोस्टर दुरुस्तीचे कारण देण्यात आले आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी ही माहिती दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले की, जिल्हा परिषदेतील अनुकंपाधारका तत्वावरील सुधारित अंतिम यादीमधील उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात दि.8 ऑक्टोबर 2020 रोजी शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात समुपदेशनाची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. परंतू आता तांत्रिक कारण देत पुन्हा एकदा नियुक्त्या लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पुढील तारीख कळविण्यात येईल असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी म्हटले आहे.

Tagged