बीड दि.18 : शहरातील दोन तरुणांचा पालीच्या तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.18) सायंकाळच्या सुमारास घडली. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत.
ओमकार लक्ष्मण काळे (वय 16) व शिव संतोष पिंगळे (वय 16 दोघे राहणार शिंदेनगर ता. बीड) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोघे पालीच्या तळ्यावर गेले होते. त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. याची माहिती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि.संतोष साबळे यांना मिळतात त्यांनी कर्मचारी पी.टी. चव्हाण, आनंद मस्के यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणांचे मृतदेह तलावाच्या सांडव्या जवळ आढळून आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलिस करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून हा अपघात आहे की, घातपात पोलीस करत आहेत.