पोलीस पाटलामार्फत लाचेची मागणी करणार्‍या एपीआय गणेश मुंढेंना अटक!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र


बीड दि.13 : उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि.गणेश मुंढे यांनी निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी 70 हजार लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी गणेश मुंढे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, येरमाळा) यांनी रत्नापुर येथील पोलीस पाटील सुशन जाधवर यांचे मार्फत तक्रारदार यांच्याकडे दि.22 ऑगस्ट 2021 रोजी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती दोन्ही आरोपी यांनी 70 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केले होते. आरोपी यांची लाचमागणी पडताळणी केल्यानंतर बुधवारी (दि.13) येरमाळा पोलीस ठाण्यात येथे गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उस्मानाबादचे उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.अशोक हुलगे, पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, विशाल डोके, अविनाश आचार्य यांनी केली. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Tagged