वीज कोसळून युवकाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

जाटनांदूर दि.9 : शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकाच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला. ही घटना पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही जवळील मिसाळवाडी येथे शनिवारी (दि.9) सायंकाळच्या सुमारास घडली.
शिवराज गोविंद चव्हाण (वय 16) असे युवकाचे नाव आहे. शिवराज व अंकुश सोनाजी चव्हाण हे मिसाळवाडी शिवारात असणार्‍या गवळवाडी माळरानावर गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी सायंकाळच्या सुमारास आचानकच विजांचा कडकडाट सुरु झाला. अंगावर विज कोसळून शिवराजचा मृत्यू झाला. तर अंकुश चव्हाण हे बचावले. डोंगरकिंन्ही परिसरात उत्तम पखवाज वादक म्हणून शिवराजची ओळख होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tagged