चित्रा वाघ यांच्या पतीवर गुन्हा नोंद

क्राईम राजकारण

मुंबई- मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंद करा म्हणून गेली 20 दिवस सातत्याने आवाज उठवणाऱ्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी एसीबीकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
किशोर वाघ यांची 2016 साली लाच लुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्याची एसीबीकडून चौकशी सुरू होती. आज अखेर या प्रकरणात बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वाघ यांच्यावर झालेली ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप भाजपा ने केला आहे. तर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, हे प्रकरण भाजप सरकारच्या काळातील आहे. तेव्हापासून ही चौकशी सुरू होती, आता चौकशी पूर्ण झाली असेल त्यानंतर हा गुन्हा नोंद झाला असेल, असं त्या म्हणाल्या.

Tagged