रिक्षा चालकाच्या मुलाची मेंदूच्या आजारासह निमोनियाशी झुंज; मदत करण्याचे अवाहन

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

खाजगी रुग्णालयात उपचार सुरू, मात्र उपचारासाठी पैसे नाहीत
नेकनूर दि.4 कोरोना महामारीमुळे अनेक व्यवसायीकांचे कंबरडे मोडले आहेत. त्यात रिक्षा चालकांचे तर हातावरचे पोट.. रिक्षा बंद असल्याने अनेकांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात अशाच एका रिक्षा चालकाच्या मुलाची मेंदुच्या आजारासह निमोनियाशी झुंज सुरु आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने हे कुटूंब मोठ्या अडचणीत सापडले आहे. दानशुरांनी मदत करावी असे अवाहन करण्यात आले आहे.

विराज निलेश मोरे (वय 03) असे उपचार घेत असलेल्या मुलाचे नाव आहे. निलेश मोरे हे नेकनूर येथे रिक्षा चालवतात. ना कसली जमीन ना दुसरा कोणता उद्योग. रिक्षा चालवून आपली उपजिवीका भागवत आहे. सगळं काही व्यवस्थित सुरु असताना मागील महिन्यात विराजला अचानक ताप आला. त्यामुळे त्याला उपचारासाठी बीड येथे दाखल करण्यात आले. मात्र विराजचा ताप कमी होण्याऐवजी तो वाढतच होता. त्यामुळे त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले. महगडे औषध, दररोजचा रुग्णालयाचा खर्च हा मोरे कुटूंबीयांना न पेलणारा आहे. चिमुकल्याच्या उपचारासाठी दानशुरांनी मदत करावी असे अवाहन केले जात आहे. मदतीसाठी शैलेश मोरे यांच्या फोन पे/ गुगल पे 8657163016 या नंबरवर किंवा एसबीआय बँक खाते नंबर 62171192864, आयएफसी कोड-एसबीआयएन0020406 यावर पैसे पाठवून मदत करु शकता.


दररोज 25 ते 30 हजारांचा खर्च
औरंगाबाद येथील अमृत बाल रुग्णालय येथे विराजला उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. मेंदुरज्जू (मेंदुचा आजार), निमोनिया, पांढर्‍या पेशी कमी झालेले आहेत. हे आजारामुळे 4 दिवसांपासून व्हेंटिलेटर वर आहे. तरी त्याच्या उपचारासाठी प्रतिदिवस 25 ते 30 हजार रुपये खर्च येत आहे. तरी त्याचा संपूर्ण खर्च अंदाजित डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 लाखापर्यंत होईल म्हणून सांगितले आहे.

मदतीसाठी नेकनूरकरांनी पुढे येण्याची गरज
निलेश मोरे यांच्या मुलाच्या उपचारासाठी त्यांच्या कडे पैसे नाहीत. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने महागडे औषध उपचार सुरू आहेत. निलेशची परिस्थिती नाजूक असून त्याला आर्थिक मदतीसाठी नेकनूरकरांनी पुढे येण्याची गरज आहे.

Tagged