BEEED JILHA PARISHAD

बीड जिल्हा परिषदेतील आणखी दोन बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

ग्रामविकास विभागाने काढले आदेश

बीड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदलीनंतर आता आणखी दोन बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबतचा आदेश ग्रामविकास विभागाने आज (दि.२) काढला आहे.

बीड जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदली पाठोपाठ आता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद सुभाषलाल भंडारी यांची पुणे येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भगवान गिरी यांची लातूर येथील जिल्हा परिषदेत रिक्त पदी नियुक्ती केली आहे. दरम्यान ग्रामविकास विभागात बदली सत्र सुरू असून येथील जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, मात्र त्यांच्या जागी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची अद्यापही प्रतीक्षा आहे.

Tagged