sachin waze

‘ती’ मर्सिडीज सचिन वाझेच वापरत होते

देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई- सचिन वाझे प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. सकाळपासून जी मर्सिडीज गाडीचा पोलीस शोध घेत होते ती गाडी देखील पोलिसांना सापडली आहे. विशेष म्हणजे ही गाडी सचिन वाझे हेच वापरत होते अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. यापूर्वी स्फोटक ठेवलेली स्कॉर्पिओ आणि संबंधित इनोव्हा देखील सचिन वाझे वापरत असल्याचे पुढे आले होते.
दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात उद्यापर्यंत एका मंत्र्यांचा देखील राजीनामा होऊ शकतो असे विधान केले आहे. त्यामुळे सरकार हादरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज वर्षा निवासस्थानी बैठक देखील झाली. त्यात मुंबईचे पोलीस आयुक्त बदलण्या विषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. पोलीस आयुक्तांना बदलण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत असे सूचक विधान पवार यांनी बैठकीनंतर केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसाठी येणारे काही दिवस कठीण आहेत.

Tagged