crime

मॅसेज, कॉलच्या त्रासाला कंटाळून नर्सिंगच्या विद्यार्थीनीची आत्महत्या 

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

परळी :  एक युवक सातत्याने मोबाईलवर फोन करून त्रास देत असल्याने शहरातील जगतकर गल्ली (भिमनगर) येथील 24 वर्षीय नर्सिंग करणार्‍या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे 12 जून रोजी घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात 24 जून रोजी तक्रार दाखल केली आहे. इस्लामपूरबंगला भागातील उस्मान लतीफ शेख (वय-24) या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जगतकर गल्लीतील निकिता सखाराम जगतकर (वय-24) नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. भीमनगरपासून जवळच असलेल्या इस्लामपूरा बंगला येथे राहणार्‍या व वेल्डिंगचे काम करणारा लतीफ शेख उस्मान हा सातत्याने मोबाईलवर फोन करून तिला त्रास देत होता. 12 जूनला आई-वडील एका लग्नाला गेले असता मुलीने घरात गळफास घेऊनआत्महत्याकेली. आई-वडील घरी येताच घराचा दरवाजा लावलेला दिसला. दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला असता मुलीने आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात 24 जून रोजी मुलीचे वडील सखाराम जगतकर यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी उस्मान लतीफ शेख विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व ट्रॉसिटी कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत. आरोपीने मुलीस मोबाईलवर संपर्क केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Tagged