डिझेलचे भाव गगनाला भिडले, सतत दरवाढ सुरूच

देश विदेश न्यूज ऑफ द डे

दिल्ली ः कोरोना पार्श्वभूमीवर सगळीकडे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असताना, बाजारपेठांमध्ये महागाई वाढताना पाहायला मिळत आहे. असे असतानाच, भारतात डिझेलचे भाव देखील वाढले आहेत. हि दरवाढ सलग तिसर्‍या दिवशी झाली आहे.

भारतीय बाजारात डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. राजधानी दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा महाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज सलग अठराव्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर पेट्रोलचे दर कालएवढेच आहेत मागील 18 दिवसात डिझेलच्या दरात प्रति लिटर 10.48 रुपयांनी वाढ झाली आहे. आजचे डिझेलचे दर 79.88 इतके आहेत. तर पेट्रोलही 8.50 रुपयांनी महागलं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 18 दिवसांपैकी बरेच दिवस क्रूड ऑईलचे दर सामान्य असताना भारतीय बाजारात याचे दर सतत वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत 40 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किमतीत त्या हिशेबाने कमी झालेल्या नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून मागील 18 दिवसात डिझेलच्या दरात 10.48 रुपये प्रति लीटरने वाढ झाली हे. या अठरा दिवसात पेट्रोलचे दरही 8.50 रुपये प्रति लिटर वधारले आहेत.

हे आहे दिल्लीतील डिझेल दरवाढीचे कारण
दिल्लीमध्ये इंधनावर लागणारा कर एप्रिल महिन्यापर्यंत देशात सर्वात कमी होता. दिल्ली सरकारने 4 मे रोजी डिझेलवरील व्हॅट 16.75 टक्क्यांनी वाढवून 30 केल्यानंतर दिल्लीमध्ये डिझेलची किंमत मुंबईपेक्षाही वाढली आहे. पेट्रोलवरचा व्हॅटही वाढवला, आधी 27 टक्के असलेला व्हॅट आता 30 टक्के करण्यात आला. यामुळे पेट्रोलच्या दरात 1.67 रुपयांनी वाढ झाली. तर डिझेलचे दर 7.10 रुपयांनी वधारले.

Tagged