काळ्या बाजारामध्ये जाणारा धान्याचा आयशर टेम्पो पकडला!

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आष्टी
दि.29 : रेशन दुकानांवर गोर-गरीब नागरीकांना अल्पदरात पुरवण्यात येणारा गहू, तांदूळसह इतर धान्य असा एकूण 105 क्विंटल धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वस्त धान्य दुकानदार हे गोरगरीब लाभार्थींना धान्य न देता त्याची मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात विक्री केली जाते. सोमवारी पहाटेच्या सुमारास एक आयशर टेम्पो (एमएच016 इ-9616) किनारा चौक आष्टी येथे पकडला. चालक शेख जैनोद्यीन शेख अल्लाउद्दीन (रा.नेकनूर) यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदरील टेम्पोत राशनचा गहू, तांदुळ आढळून आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रमोद काळे करत आहेत.


टेम्पोमध्ये आढळलेला माल
पकडलेल्या टेम्पोमध्ये गहू 11, तांदुळ 77, चिंच 5, येरंडी 14, बाजरी 10, ज्वारी 18, हरभरा 34, तुर 13, मटकी 2 असे एकूण 184 कट्टे 105.79 क्विंटल मालाचा पंचनामा आष्टी तहसीलचे पुरवठा नायब तहसीलदार महादेव पंढरपुरे व अव्वल कारकून टि.बी पठाडे यांनी केला. हे धान्य आष्टी येथील शासकीय गोदामात जमा केले आहे.

Tagged