corona

बीड जिल्ह्यात कोरोना आटोक्यात

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

७ तालुक्यांचा आकडा ५ च्या आत

बीड : जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना आटोक्यात आल्याची चिन्हे आहेत आज (दि.२३) कोरोनाचा आकडा अर्धशतकाच्या जवळ आला आहे. विशेष म्हणजे ७ तालुक्यांचा आकडा ५ च्या आत आहे. त्यामुळे आता बीड जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे.

रविवारी ४ हजार १६४ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२३) प्राप्त झाले, त्यामध्ये ५५ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४ हजार १०९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात २०, अंबाजोगाई ७, आष्टी १०, धारूर ४, गेवराई १, केज २, माजलगाव १, पाटोदा ३, शिरूर २ तर वडवणी तालुक्यात ५ असे रुग्ण आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

Tagged