ओढ्याच्या पुरात दुचाकीसह दोघे वाहून गेले!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

धारूर दि.27 : तालुक्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणच्या गावचा संपर्क तुटलेला आहे. यात रविवारी रात्री चिंचपूर येथील पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण दुचाकीसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.
धारूर आडस रस्त्या दरम्यान आवरगाव आणि पांगरी या ठिकाणी फुलावर पाणी आले होते. तसेच चोरांबा, पाडीपारगाव, अरणवाडी, अंजनडोह, मोहखेड, सुरनरवाडी, व्हरकटवाडी, आसोला या ठिकाणीही पाणीपातळीत वाढ झाल्याने सदरील रस्ते प्रवासासाठी बंद होते. यातच रविवारी रात्री चिंचपूर येथील पुलावरून पाणी ओसंडून वाहत असताना महादेव सोनवणे (वय 45), उत्तम सोनवणे (दोघे रा.उंदरी ता.केज) यांनी पाण्यातून दुचाकी (एमएच 44 एन 7829) घातली. यावेळी दुकजकीसह दोघे पाण्यात वाहून गेले. रविवारी रात्री महादेव यांचा मृतदेह आढळला तर उत्तम यांचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला आहे. घटनास्थळी धारूर पोलीस व ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

Tagged