बीड जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्सबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्समध्ये प्रवेशाबाबत महत्वाचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांनी आज (दि.१७) जारी केला आहे.

राज्य शासनाच्या ‛ब्रेक द चैन’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. त्याठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस पूर्ण व दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील, तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. तसेच, वय वर्षे १८ खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु न झाल्याने वय वर्षे १८ खालील वयोगटातील मुला/मुलींना मॉल्समध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागांची राहील. सदर आदेश दि.१७ ऑगस्ट २०२१ पासून अंमलात येतील, असे बीडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांनी आदेशात म्हटले आहे.

Tagged