गेवराई दि.26 : तुटलेल्या पुलावरून प्रवास करताना अचानक पूल तुटल्याने पुरात तरुण वाहून गेला. ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे रविवारी (दि.26) सकाळी घडली.
सुदर्शन संदिपान संत (वय 37) गेवराई तालुक्यातील भोजगाव गावालगत असलेल्या अमृता नदीवरील पूल वाहून गेल्याने कठाड्यावरून नदी पार करताना गावातील सुदर्शन हा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सकाळी 9 वाजता घडली. या तरुणाचा मृतदेह धोंडराई पुलाजवळ सापडला. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.