varsha gaikwad

अखेर 10 वीच्या परीक्षा रद्द

न्यूज ऑफ द डे बीड

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : दहावीची परीक्षा यापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

   सध्या राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.

Tagged