सिरसाळा ठाण्यात एसीबीची कारवाई

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

सिरसाळा दि.23 : राखेची वाहतूक करण्यासाठी तीन टिप्पर चालू देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच खाजगी इसमामार्फत स्विकारली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यासह खाजगी इसमावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि.23) दुपारी उस्मानाबादच्या एसीबीने केली.
उमेश यशवंत कनकावार, गजानन अशोक येरडलावर (दोघे पोलीस शिपाई नियुक्ती सिरसाळा पोलीस स्टेशन) व खाजगी इसम नदीम मोसीन पठाण अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत. तक्रारदार यांच्याकडे राख वाहतूक करणार्‍या तीन हायवा टिप्पर चालू ठेवण्यासाठी कानकावार व येरडलावर यांनी नऊ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती सहा हजार रुपये लाच खाजगी इसम मोसीन पाठाण याच्या मार्फत सिरसाळा येथे स्विकारली. या प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली असून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक मारुती पंडित, उस्मानाबाद उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, अर्जुन मारकड, चालक दत्तात्रय करडे यांनी केली. या कारवाईने जिल्हा पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Tagged