amarsinh pandit

अमरसिंह पंडित गेवराईत उभारणार 200 खाटाचे कोविड केअर सेंटर

कोरोना अपडेट गेवराई न्यूज ऑफ द डे

गेवराई : कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या अनुषंगाने गेवराई तालुक्यात 200 खाटांचे कोविड केअर सेंटर आरोग्य विभागाच्या मदतीने सुरु करणार असल्याची माहिती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली. पुढील आठवड्यात पहिल टप्यात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वीत होणार असून या ठिकाणी 20 बेडसाठी ऑक्सीजनची सुविधा सुद्धा उपलब्ध करणार आहे.
यावेळी तहसिलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे उपस्थित होते. रुग्णांना उपचारासाठी लागणार्‍या सुविधांचा आढावा घेवून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशीही दुरध्वनीवर चर्चा केली.

कोरोना सारख्या महामारीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व शिवछत्र परिवाराने मोठ्या प्रमाणावर गरजू लोकांना यापुर्वी मदतीचा हात दिला. आरोग्य यंत्रणेला व्हेंटीलेटर, एक्सरे मशिनसह मोठ्या प्रमाणावर आरोग्य विषयक यंत्र सामुग्री भेट म्हणून दिली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सुद्धा माजी आमदार अमरसिंह पंडित सक्रीय झाले असून त्यांनी आरोग्य यंत्रणेला मदत करण्याचा निर्धार केला आहे. शनिवार गेवराई येथे वाढत्या कोविड रुग्ण संख्येबाबत त्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. तालुक्यात 200 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारणीसाठी त्यांनी स्वत:हुन पुढाकार घेतला असून शिवाजीनगर (गढी) येथील जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इमारतीमध्ये हे सेंटर सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. या अनुषंगाने त्यांनी गढी येथील जयभवानी शिक्षण संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये 20 ऑक्सीजन बेड सुरु करणे बाबत तयारी दर्शविली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम व उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे यांनी जागेची पहाणी करुन आरोग्य सुविधा उभारणी बाबत मार्गदर्शन केले. यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा मोठा भार कमी होणार आहे. केवळ उपदेश आणि सल्ला न देता माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी थेट कृती केली असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा
माजी आ.अमरसिंह पंडित यांनी यापुर्वीही जिल्हा रुग्णालयास व्हेंटीलेटर देऊन आरोग्य सुविधेस हातभार लावला होता. आताही त्यांनी 200 खाटाचे कोविड केअर सेंटर सुरु करण्याची घोषणा करून त्याबाबत तयारी सुरु केली. त्यांच्या या कामाचा आदर्श सर्वच पक्षाच्या नेत्यांनी घेणे आवश्यक आहे. काहीजण नुसते सरकारच्या नावाने बोंबलत आहेत.

Tagged