popatrao pawar, bhaskarrao pere patil

ग्रामपंचायत निवडणूक : पोपटराव पवार अन् पेरे पाटलांच्या गावात काय झालं?

न्यूज ऑफ द डे राजकारण

नगर, औरंगाबाद, दि. 18 : अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या हिवरे बाजारमध्ये तीस वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पोपटराव पवार यांनी विजय मिळवला आहे. पोपटराव पवार popatrao pawar यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे सर्वजण विजयी झाले आहेत.

तर इकडे औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं bhaskarrao pere patil वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल 25 वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांचा पराभव झालेला आहे.

भास्कर पेरे-पाटील यांचा तब्बल पंचवीस वर्ष एक हाती गावावर वर्चस्व होतं. मात्र यावर्षी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली, यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उभ्या होत्या. त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.

अनुराधा पेरे-पाटील यांच्याविरोधात उभे असलेल्या दुर्गेश खोकड यांना 204 मतं मिळाली, तर अनुराधा पेरे पाटील यांना 184 मतं मिळाली. पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या पेरे-पाटील यांनी पाटोदा गावाचं रूपडं बदललं, गावाला आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रभर ओळख दिली. त्यात गावात त्यांच्या मुलीचा मात्र पराभव झाला आहे. या पराभवामुळे भास्कर पेरे-पाटील यांना देखील गावात पराभव होण्याची कुणकुण लागली होती का? त्यामुळे त्यांनी माघार घेतली अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.

पाटोद्यात निवडणूक व्हायची पण पेरे निर्विवाद बाजी मारायचे. मात्र यावर्षी पेरे पाटलांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनलची उभा केला नाही. आता पुढच्या पिढीला संधी द्यायची म्हणून आपण बाजूला झाल्याचे पेरे पाटील यांनी सांगितलं होतं.

Tagged