corona virus image

आणखी एका मंत्र्यास कोरोनाची लागण

न्यूज ऑफ द डे

मुंबई : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात अनेकजण आल्याची शक्यता आहे.

   शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः ट्वीट करून सांगितले. त्यांच्या बंगल्यावरील एक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट केली होती. यात त्या पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यानंतर त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले की, माझ्या तपासणी दरम्यान मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या, असे म्हटले आहे.

Tagged