शेतमजूर ते जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास
धारुर : तालुक्यातील आसरडोह येथील रहिवासी बीड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शोभा भारत पिंगळे यांचे आज (दि.2) दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी आसरडोह येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.
शोभा भारत पिंगळे या आसरडोह जिल्हा परिषद गटातून भाजप नेते रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली विजयी झाल्या होत्या. नंतर 2009 ते 2011 पर्यंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाही होत्या. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या उपचारादरम्यान आज शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6.30 वाजता शेतात अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. शेतमजूर ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा एका सामान्य महिलेचा प्रवास आहे.