बीड बाजार समितीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना मोठा धक्का!

न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.29 : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. 40 वर्षापासून ताब्यात असलेल्या बाजार समितीचा निकाल जाहीर होत असून ग्रामपंचायत मतदार संघातील शेतकरी परिवर्तन महाआघाडीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

यामध्ये शेतकर्‍यांच्या प्रश्नी कायम आक्रमक असणारे धनंजय आसाराम गुंदेकर यांच्यासह गणेश उगले बाबासाहेब, काळे दिपक गणपतराव, मुळे सरला कमराज यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत मतदार संघातून चार पैकी चारही उमेदवार शेतकरी परिवर्तन महाआघाडीचे विजयी झाले आहेत. सोसायटी मतदार संघातही शेतकरी परिवर्तन महाआघाडी आघाडीवर असल्याची माहिती आहे.

Tagged