डॉ.तात्याराव लहाने यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार जाहीर

न्यूज ऑफ द डे बीड

मुंबई : यंदाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.दौलत देसाई यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.

एक लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर पुरस्कार वितरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देण्यात आला होता. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तीला अथवा संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 1984 पासून आत्तापर्यंत भाई माधवराव बागल, व्ही.शांताराम, डॉ.बाबा आढाव, तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी, गुरु हनुमान, नानासाहेब गोरे, चंद्रकांत मांढरे, कुसुमाग्रज, मायावती, न्या.पी.बी. सावंत, रँग्लर नारळीकर, आशा भोसले, राजेंद्रसिंह, प्रा. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, भाई वैद्य, शरद पवार, पुष्पा भावे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Tagged