‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले; अखेर इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा

न्यूज ऑफ द डे पश्चिम महाराष्ट्र

संगमनेर : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अखेर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर कोर्टात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात मुला-मुलीच्या जन्माविषयी केलेल वक्तव्य त्यांना भोवलं असून सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल केला होता. पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. इंदोरीकर यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद राज्यभर सुरु झाला होता. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले होते. अनेक संघटनांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेत आंदोलनं केली होती. यामुळं इंदोरीकर महाराजांना त्यांचे किर्तनाचे कार्यक्रम देखील रद्द करावे लागले होते. तर त्यांच्या बाजूने देखील एक गट रस्त्यावर उतरला होता. दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी याविषयी माफी देखील मागितली होती.

Tagged