corona vaccine

रशिया पाठोपाठ चीन कडून कोरोनावरील लसीची घोषणा

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे

फेज ३ चाचणीच्या निष्कर्षांची वाट न पाहता परवानगी मिळाल्याने चीनची व्यावसायिक मानसिकता जगापुढे

वुहान : वुहान मध्ये कोरोनाचा जन्म, पूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात, लाखो मृत्यू, अनेक कोरोनाग्रस्त, जागतिक व्यवसाय ठप्प, दळणवळण ठप्प, या सगळ्या घडामोडींचे श्रेय फक्त आणि फक्त चीनला जाते. मुळात पहिल्या प्रथम कोरोनाविषयी माहिती लपविल्याने चीन जागतिक स्तरावर आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. अशातच रशियाने नुकतीच कोरोनावरील लस शोधली आणि उत्पादन देखील सुरु झाले आहे. आता चीन सुद्धा रशियाच्या पावलावर पाऊल ठेवत लस शोधल्याचा दावा करत आहे.

चिनच्या वॅक्‍सीन ‘ए डी ५ – एन सी ओ व्ही’ ला पेटेंट मिळालं आहे. नॅशनल इंटेलेक्‍चुअल प्रॉपर्टी एडमिनिस्‍ट्रेशनने चीनला लसीचे पेटंट मिळाल्याची माहिती दिली. या वॅक्सीनला कॅन्सिनो बायोलॉजिकस च्या मदतीनं तयार केलं आहे. पण रशियाच्या लसीप्रमाणेच, या चीनच्या लसीवरही फेज -3 चाचणीच्या निकालाची वाट न पाहता मंजुरी देण्यात आली आहे आणि याच मुळे हि लस वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जगभरात अनेक देशात या चिनी लसीच्या फेज ३ च्या चाचण्या सुरु आहेत, त्याचे परिणाम पाहण्यापूर्वीच पेटंट मिळाल्याने, चीन चे हे वैज्ञानिक नाही तर व्यावसायिक यश आहे असे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

सौदी अरब देशाकडून या चिनी लसीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. रशिया, चिली आणि अफगाणिस्तान सोबत बोलणी सुरु असून, वर्षअखेर हि लस बाजारात येण्याची शक्यता आहे.

Tagged