kaij corona

केज : 1.30 वाजेपर्यंत 13 व्यापारी पॉझिटिव्ह

केज कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

केज : तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी येथील 3 तपासणी केंद्र आणि 1 फिरते पथक मिळून दुपारी दीड वाजेपर्यंत 356 व्यापार्‍यांनी तपासणी केली असून त्यापैकी 13 व्यापार्‍यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह corona positive आल्या आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

   शहरात सकाळी 10 वाजल्यापासून सरस्वती महाविद्यालय, वसंत महाविद्यालय, जि.प.माध्यमिक शाळा आणि कंटेनमेंट झोनमधील व्यापार्‍यांसाठी स्थापन करण्यात आलेले पथक अशा एकूण 4 तपासणी केंद्रात मिळून दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण 356 व्यापार्‍यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 13 व्यापारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांचे सर्व यंत्रणेवर नियंत्रण आहे.
corona update

Read e paper KARYARAMBH

Tagged