ऐतिहासिक निकाल : बीड जिल्ह्याचा दहावीचा निकाल 99.96 टक्के

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

बीड : माध्यमिक शालांत परिक्षा इयत्ता 10 वीचा निकाल आज (दि.१६) ऑनलाईन जाहीर झाला. औरंगाबाद विभागाचा एकूण निकाल 99.96 टक्के लागला आहे.

जिल्ह्यातील 40 हजार 535 विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 40 हजार 522 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 13 विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा निकाल 99.96 टक्के लागला असून औरंगाबाद विभागात बीड जिल्हा चौथ्या स्थानी आहे. दरम्यान कोविडमुळे मार्च 2021 मध्ये दहावीच्या परिक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे परिक्षा न होताच लागलेला हा निकाल ऐतिहासिक आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद विभागीय मंडळाचा दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहिर झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्हा 99.97 टक्के, बीड 99.96, परभणी 99.90, जालना 99.97, हिंगोली 99.96 टक्के निकाल जाहिर झाला आहे. विभागातून 1 लाख 76 हजार 290 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 76 हजार 223 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहेत.

सर्व्हर डाऊन
दहावी बोर्डाचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमीक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ज्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल असे सांगितले होते. त्या संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता आला नाही.

Tagged