पोलीसांना नक्कीच लाज वाटली असेल…

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

चोरीची दुचाकी विक्री करताना
मुळ मालकानेच चोरटा पकडला!

बीड दि.16 : एका हॉटेलवरुन चोरलेली दुचाकी विक्रीसाठी चोरटा त्याच शहरात आला. याची माहिती दुचाकीच्या मालकाला मिळाली. सदरील चोरट्यास पकडून बेदम चोप दिला असून पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. हा प्रकार माजलगाव शहरातील आंबेडकर चौकात घडला.
बाळू कोकरे (रा.टोकवाडी ता.परळी) असे चोरट्याचे नाव आहे. बुधवारी (दि.14) दुपारी गढी रोडवरील साई धाबा याठिकाणी जेवण करण्यास गेलेल्या परमेश्वर पारेकर (रा.शिंदेवाडी) यांची होंडा ड्रीम युगा दुचाकी (एम एच 44 व्ही 3169) चोरट्यांनी लंपास केली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सदरील दुचाकी आंबेडकर चौकात विक्रीसाठी आणली असल्याची माहिती पारेकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ तिथे पोहचत चोरट्यास चोप दिला. त्याने बाळू कोकरे नाव असून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यास शहर पोलीसांच्या स्वाधीन केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनो लोकांचे खिसे चापाचापी
करणे आता तरी सोडून द्या…

माजलगाव शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घटना सतत घडत आहेत. मात्र याचे पोलीसांना कसलेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. कारण दुचाकीचोर नागरिकांना सापडतात पण पोलीसांना नाही. कारण पोलीस नुसते ह्याचे त्याचे थोबाडं बघून कुणाचे तरी खिसे चापाचापी करीत बसतात. त्यांनी असले धंदे सोडून दिले तर किमान वर्दीचा धाक निर्माण होऊन सामान्य लोकांना न्याय देता येईल. त्यांचा धाकच शिल्लक नसल्याने चोरटे बाहेरगावहून माजलगावात येतात आणि पुन्हा माजलगावातच चोरीचा माल देखील विकतात. याला काय म्हणायचे?

Tagged