पोळ्याला बैल एकत्रित आणण्यावर निर्बंध

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड : जिल्ह्यात 11 तालुक्यांमधील 168 ठिकाणी लंपी चर्मरोग लागण झाल्याने जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच दि. 14 सप्टेंबर रोजी बैलपोळा सण साजरा होत आहे सदरील रोग हा संसर्ग असल्याने इतर पशुधनास त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व ठिकाणी सणानिमित्त जनावरे एकत्रित आणण्यास व एकत्रितपणे मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष दीपा मुधोळ मुंडे यांनी प्राण्यांमधील संक्रमण आणि रोगप्रतिबंध अधिनियम 2009 नुसार हा मनाई आदेश जारी केला आहे. सर्व तालुक्यातील बैलपोळा सणानिमित्त एकत्रित येणे व मिरवणूक यावर मनाई करण्यात येत आहे जिल्ह्यातील पशुपालक व शेतकरी यांनी घरगुती स्वरूपात बैलपोळा सण साजरा करण्यावर भर द्यावा व जनावरे एकत्रित आणू नये असे कळविण्यात येत आहे.

Tagged