नेकनूर दि.16 : आई वडिलांना काम होत नार्हीें लहाना भाऊ भोळसर. त्यामुळे कुटूंबाची पुर्ण जबबदारी असलेल्या तरुणाची नोकरी गेली. तरीही हिंमत ठेवत गावी काम शोधले. पण कामही मिळाले नाही. अखेर आलेल्या नैराश्यातून घरातील कर्ता तरुणाने आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना नेकनूर येथे घडली.
बाजीराव सुदाम पांचाळ (वय 32 रा.नेकनूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बाजीराव हा अनेक महिन्यापासून पुण्यात खाजगी कंपनीत काम करत होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन पडले. अन् बाजीरावला काम सोडावे लागले. पुर्ण बिराड घेऊन बाजीराव गावी आला. मात्र गावी आल्यानंतर गावात काहीही काम मिळेना. घरातील दैनदिन खर्च हा सुरुच होता. कधीतरी रोजंदारीवर काम मिळायचे तर कधी नाही. त्यामुळे बाजीराव हे पूर्ण कोलमडून पडले होते. याच नैराश्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी भाऊसाहेब वाघमारे, दीपक खांडेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी नेकनूर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.