पुरोगामी विचारवंत प्रा.एन.डी. पाटील यांचे निधन

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

कोल्हापूर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर : सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे आज (दि.१७) वृद्धापकळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.

कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना करोनाचा संसर्ग देखील झाला होता. परंतु या वयात देखील त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Tagged