jcb

गोदापात्रातून वाळू तस्करी; दोन ट्रॅक्टरसह जेसीबी जप्त

गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

गेवराई : तालुक्यातील कटचिंचोली येथील गोदावरी नदीपात्रातुन अवैधरित्या वाळु उपसा सुरू असताना गेवराईत उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांचे पथक व तलवडा पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकुन कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दोन ट्रॅक्टर, जेसीबी असा एकुण 24 लाख 40 हजार रूपयांचे साहित्य जप्त केला.

उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.श्रीनिवास चनेबोईनवाड व तलवडा ठाण्यातील प्रभारी उनवणे, पो.ना.वडकर, राऊत, मुंजाळ यांनी कटचिंचोलीतील गोदावरी नदीपात्रात छापा टाकला असता त्याठिकाणी वाळु उपसा सुरू असल्याचे दिसुन आले. पोलीस आल्याचे पाहुन चार ट्रॅक्टर नदीच्या मार्गाने पळुन जाऊ लागले. त्याचवेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता दोन ट्रॅक्टर व जेसीबीच्या चालकांने आपली वाहने जाग्यावर सोडुन पळ काढला. पोलिसांनी विना नंबरची जेसीबी, ट्रॅक्टर क्र.एम.एच.23 बी.7767 व विना नंबरचे आणखी एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण 24 लाख 40 हजार रूपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी दोन ट्रॅक्टर मालक व जेसीबी चालक-मालक यांच्याविरूद्ध तलवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राऊत हे करत आहेत.

Tagged