Nitin Gadkari

सध्या मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही : नितीन गडकरी

महाराष्ट्र राजकारण

मुंबईः “सध्याच्या घडीला मुंबईला येण्याची हिंमत माझ्यात नाही” असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. देशातील सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असून पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात मुंबई एक मुख्य हॉटस्पॉट आहे. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ५९ हजार २०१ वर गेली आहे. तर मृतांची संख्या २२४८ वर गेली आहे.

“सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल असा मला विश्वास आहे,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. करोनानंतर लघु उद्योग तसंच पायाभूत सुविधा कशा पद्दतीने विकासाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिक निभाऊ शकतात यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावरूनच मुंबईची स्थिती आणि कोरोनाग्रस्तांची संख्या हे किती गंभीर प्रकरण झाले आहे लक्षात येते.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged