corona

बीड जिल्हा : आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह

केज बीड

बीड : जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेले 87 स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्या दवाखान्यातील डॉक्टरसह कर्मचार्‍यांचे स्वॅब निगेटिव्ह
केज : तालुक्यातील माळेगाव येथील मयत कोरोनाग्रस्त महिलेने उपचार घेतलेला केजमधील खाजगी दवाखाना सील करण्यात आला होता. त्या दवाखान्यातील डॉक्टरसह अन्य कर्मचार्‍यांचे असे एकूण 10 स्वॅब निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी दिली आहे.
तालुक्यातील माळेगाव येथील मयत कोरोनाग्रस्त महिलेने उपचार घेतलेला केजमधील खाजगी दवाखाना सील करण्यात आला होता. कोरोनाग्रस्त महिलेचा औरंगाबाद येथे मृत्यू झाल्याची माहिती आज आरोग्य प्रशासनाने दिली. त्यानंतर आरोग्य विभागाने सदरील महिलेने केजमध्ये उपचार घेतलेला दवाखाना सील केला. सुदैवाने त्या दवाखान्यातील डॉक्टरसह अन्य कर्मचार्‍यांचे स्वॅब निगेटिव्ह आले, ही केज तालुक्यासह जिल्हासाठी मोठी दिलासादायक बाब आहे.

महिलेच्या नातेवाईकांचे स्वॅब घेणार
संबंधित महिलेच्या कुटुंबियांचे एकूण 10 स्वॅब आज तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली आहे.

Tagged