corona

बीड जिल्हा : आज ‘इतके’ कोरोनारुग्ण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात रविवारी (दि.१३) कोरोनाचे १०८ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे.

जिल्ह्यातून शनिवारी २४५१ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.१३) प्राप्त झाले, त्यामध्ये १०८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर २३४३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात १३, अंबाजोगाई ९, आष्टी २७, धारूर ४, गेवराई १, केज २४, माजलगाव ६, परळी, पाटोदा प्रत्येकी ४ तर शिरूर, वडवणी प्रत्येकी ८ असे रुग्ण आढळून आले.

Tagged