15 खेड्यांचा माजलगाव शहरापासून संपर्क तुटला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे माजलगाव

देवळा, लोणगाव, पात्रुडच्या पुलावरून पाणी

माजलगाव : तालुक्यातील 10 ते 15 गावांतील परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पात्रूड येथील नदीला पूर आला आणि पुलाचे काम चालू असल्याने पर्यायी पूल खचला. तर देवळा, लोणगावचा पुलावरुन पाणी जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

तालुक्यात आज (दि.13) मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाला. यामुळे सरस्वती नदीला पहिल्याच पावसात पूर आला. देवळा येथील पुलावरून पाणी आल्याने देवळा, उमरी, पारगाव, जीवनापूर या गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. तर लोणगाव येथून ओढ्याला पूर आल्याने लोणगावचा संपर्क तुटला आहे. पात्रूड येथे दीड वर्षांपासून पुलाचे काम कासव गतीने चालू आहे. या पुलाला पर्यायी पूल तयार केला होता. तो पूल रात्री झालेल्या पावसाने खचला. यामुळे बेलुरा, आनंदगाव, आलापूर, नाकलगाव, भगवान नगर, महादेव वस्ती यासह 10 ते 15 गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. रात्री पाऊस झाल्याने बळीराजा खूश झाला आहे. पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे घेण्यासाठी शहरात येण्यास अडचण होत आहे.

Tagged