एकट्या आष्टीत आढळले ७० रुग्ण
बीड : जिल्ह्यात रविवारी (दि.८) कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा दोनशेपार गेली आहे. एकट्या आष्टी तालुक्यातील रुग्णसंख्या ७० आहे हे धक्कादायक आहे.
शनिवारी ५१५२ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.८) प्राप्त झाले, त्यामध्ये २१६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४९३६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ३१, अंबाजोगाई ९, आष्टी ७०, धारूर ३, गेवराई १८, केज १२, माजलगाव ३१, परळी ३, पाटोदा २१, शिरूर ९, वडवणी ९ असे रुग्ण आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.