corona

कोरोना : जिल्ह्यात आजही 434 रुग्ण

कोरोना अपडेट बीड

कुठल्या तालुक्यात किती रुग्ण सविस्तर वाचा

बीड, दि. 3 : जिल्ह्यात 26 मार्चपासून लॉकडाऊन असला तरी कोरोनाचा संसर्ग थांबायचे नाव घेत नाही. उलट तो वाढतोच आहे. 3 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्हची एका दिवसातील संख्या 434 झाली आहे. लॉकडाऊनपुर्वी हीच संख्या पावणेचारशेच्या आसपास होती.

आज जाहीर झालेल्या अहवालातून 2525 जण निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 2959 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात अंबाजोगाई तालुक्यात 112, आष्टी 63, बीड 95, धारूर 4, गेवराई 13, केज 22, माजलगाव 30, परळी 54, पाटोदा 23, शिरूर 12, वडवणी 6 अशी तालुकानिहाय रुग्णसंख्या आढळून आली आहे. त्यात 0 ते 18 वयोगटातील 35 जणांचा समावेश आहे.
तालुकानिहाय आढळलेले रुग्ण खालील प्रमाणे…

1
2
3
4
5
6
7
8
9
11
12
Tagged