बीड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांची बदली!

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : सध्या प्रशासनात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. राज्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागात देखील मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्कचे बीडचे जिल्हा अधीक्षक नितीन धार्मिक यांची सोलापूरला बदली झाली आहे. तर ठाणे येथून राज्य उत्पादन शुल्कच्या बीड जिल्हा अधीक्षकपदी नितीन घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने सोमवारी काढले आहेत.

Tagged