corona testing lab

बीड जिल्ह्यातून आज सर्वाधिक स्वॅब तपासणीला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 251 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब swab तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी dho डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.

    जिल्ह्यातून आज सर्वाधिक स्वॅब घेण्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात आरोग्य health यंत्रणांकडून व्याधीग्रस्त लोकांच्या तपासणी व आरोग्य सर्वेक्षण सुरु आहे. त्यादरम्यान, लक्षणे असलेल्या संशयित व व्याधीग्रस्त लोकांचे स्वॅब घेतले असून आता दरदिवशी 250 स्वॅब घेण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन आहे.

पाठविण्यात आलेल्या स्वॅबची आकडेवारी
जिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-97, स्वा.रा.ती.ग्रा.वै.महाविद्यालय, अंबाजोगाई-3, उपजिल्हा रुग्णालय, परळी-14, उपजिल्हा रुग्णालय, केज-15, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव-5, उपजिल्हा रुग्णालय, गेवराई-17, ग्रामीण रुग्णालय, आष्टी-6, सीसीसी, बीड-41, सीसीसी, अंबाजोगाई -53

Tagged