मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
मुंबई : कोरोनाच्या दुसर्या लाटेने राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, असा निर्णय झाला. परंतू, कडक निर्बंध 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यानुसार लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी आज (दि.4) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व पालकमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी राज्याच्या प्रमुख अधिकार्यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिकट परिस्थितीवरून राज्य शासनाने कडक पाऊल उचलले आहे. लॉकडाऊनच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, कडक निर्बंध 30 एप्रिलपर्यंत असणार आहेत. राज्य शासनाचा हा जनतेसाठी दिलासादायक निर्णय आहे.