बीड : येथील जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बजरंग सोनवणे हे रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.
सोनवणे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, दोन दिवसांपासून लक्षणे जाणवत असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस उपचार घेण्यासाठी रुग्णालयात राहावे लागत असल्यामुळे नियोजीत कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहू शकणार नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली टेस्ट करून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केले आहे.